मिशन नवचेतना चंदपूर

मिशन नवचेतना 
हा जिल्हा परिषद चंद्रपूर चा नाविन्यपूर्ण उपक्रम 
सन २०१५ पासून या उपक्रमाची सुरुवात झाली 
वर्षभरात चंद्रपूर जिल्ह्यात या उपक्रमाने शिक्षक,शाळा, पालक, गावकरी व अधिकारी वर्गात चैतन्य निर्माण झाले.

मिशन नवचेतना च्या माहितीबाबत निखील तांबोळी शिक्षक चंद्रपूर यांचा लेख

मिशन नवचेतना
चंद्रपूर जिल्हयाची राज्यात आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळख आहे. त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दृष्टीने अनेक आव्हाने आहेत. या सर्व आव्हानांवर मात करून संपूर्ण जिल्ह्यात गुणवत्ता पूर्ण शिक्षण कसे देता येईल या अनुषंगाने जिल्हा परिषद चंद्रपूर तर्फे मिशन नवचेतना या शैक्षणिक उपक्रमाची सुरवात करण्यात आली.
     सन २०१४-१५ या शैक्षणिक सत्रात या उपक्रमाची सुरवात करतांना जिल्ह्यातील त्यावेळची शैक्षणिक स्थिती कशी आहे ज्यात विशेषतः मराठी, गणित व इंग्रजी या विषयाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या वर्गानुरूप कोणत्या क्षमता प्राप्त आहेत अथवा ते कुठे मागे आहेत हे जाणून घेण्यासाठी पायाभूत चाचणीचे आयोजन करण्यात आले. ही चाचणी जिल्ह्यातील १३३ केंद्रातील प्रत्येकी दोन शाळांतील (प्राथमिक १ व उच्च प्राथमिक १) इयत्ता २ ते ७ च्या विद्यार्थांची घेण्यात आली. या चाचणीच्या आधारे प्राप्त माहितीचे वर्ग, विषय तसेच क्षमता निहाय वर्गीकरण करून जिल्ह्याच्या शैक्षणिक स्थितीचा आढावा घेण्यात आला. जो निश्चितच समाधाकारक नव्हता.
     यावर उपाययोजन करणे तर गरजेचे होतेच पण काय करावे म्हणजे हे चित्र बदलेल हा हि एक मोठा प्रश्नच होता. कारण याआधीही गुणवत्ता वाढीसाठी अनेक उपक्रम वेगवेगळ्या स्तरावरून राबविण्यात आले परंतु त्यात पाहिजे तसे यश प्राप्त झाले नव्हते. यासाठी तत्कालीन मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चाचणीच्या आधारे काढलेले निष्कर्ष जिल्ह्यातील शिक्षण विभागातील सर्व प्रशासकीय अधिकारी ( BEO, Ext. officer, Kendra Pramukh), सर्व शिक्षक संघटना पदाधिकारी, शिक्षण तज्ज्ञ याचेसमोर स्वतंत्र सभेतून मांडले  ज्यात चाचणीच्या आधारे निघालेले निष्कर्ष व प्रत्यक्ष परीस्थीती या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. आणि सर्वानुमते जिल्ह्यात गुणवत्तावाढीसाठी शैक्षणिक कार्यक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले. या अनुषंगाने मे २०१४ मध्ये जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना केंद्र तथा बीट स्तरावर एकदिवसीय कार्यशाळा घेऊन हा कार्यक्रम समजून सांगण्यात आला.
     सन २०१५ -१६ मध्ये कार्यक्रमची प्रत्यक्ष अंमलबजावणी करतांना त्याची खालील प्रमाणे रचना करण्यात आली.
  थिंक टँक  - यात एकूण २८ सदस्य आहेत ज्यात प्राचार्य डायट, उपशीक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, शिक्षक, NGO प्रतिनिधी या अशा विविध स्तरावर कार्य करणा-यांचा तो गट आहे. संपूर्ण कार्यक्रमाची दिशा ठरविणे, ब्रिगेड, शिक्षक यांना प्रेरणा देऊन त्यांचे सक्षमीकरण करणे, एखाद्या ठरविलेल्या उपक्रमात काही त्रुटी आढळल्यास ती दूर करणे, ब्रिगेड तसेच शिक्षक याचे मार्फत आलेल्या सुचनांवर विचारपूर्वक निर्णय घेणे.  हे कार्य थिंक टँक करते .
  ब्रिगेड जिल्हा, तालुका तसेच केंद्र स्तर यातील महत्वाचा दुवा म्हणजे ब्रिगेड अशी ब्रिगेडची संकल्पना आहे. सन २०१५-१६ या सत्रात मराठी, गणित व इंग्रजी या विषयाचे प्रत्येकी ५ सदस्य प्रत्येक तालुक्यात केंद्रप्रमुख तथा गटशिक्षणाधिकारी यांचे मार्फत निवडण्यात आले. मात्र स्वेच्छेने काम करण्याची तयारी असणा-यांचीच यात निवड करण्यात आली. सन २०१६-१७ मध्ये सामाजिकशास्त्र हा विषय वाढविण्यात आला. तसेच ब्रिगेड ची पुनर्रचना करून तालुक्यात असलेल्या केंद्राच्या निम्मे प्रत्येक विषयासाठी निवडण्यात आले.
 

सन २०१५-१६ आयोजित करण्यात आलेले उपक्रम
Ø केंद्रसम्मेलनप्रत्येक महिण्यात प्रत्येक केंद्रात एका केंद्रसम्मेलनाचे आयोजन कण्यात आले. ज्यात मराठी, गणित व इंग्रजी विषयांवर ब्रिगेड मार्गदर्शन करण्यात आले.
Ø ब्रिगेडसक्षमीकरण कार्यशाळा केंद्रसम्मेलनात ब्रिगेडनी संबंधित विषयावर काय मार्गदर्शन करावे याविषयी ब्रिगेडची एक दिवसीय कार्यशाळा जिल्हास्तरावर थिंक टँक सदस्यांमार्फत घेण्यात आल्या.
Ø शाळाभेटबाहेरील जिल्ह्यात अथवा तालुक्यात काय विशेष सुरु आहे, त्याचा आपल्या मिशन नवचेतना या उपक्रमात काही उपयोग करता येईल काय ? ह्या उद्देशाने सातारा जिल्ह्यातील कुमठे बीट तसेच मुंबई येथील ICSE च्या शाळा येथे थिंक टँक सदस्यांच्या अभ्यासदौ-याचे आयोजन करण्यात आले.
Ø बालचेतना त्रैमासिकजिल्हापरिषदेतील शाळांत शिकणा-या विद्यार्थांमधील सुप्त गुण जसे चित्रकला, कविता लेखन, काव्य लेखन, गोष्ट तयार करणे इत्यादी व्यक्त होण्याकरिता तसेच ह्यातून इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळण्याकरिता हे त्रैमासिक प्रकाशित करण्यात आले.
Ø नवचेतना शाळाकेंद्रांतर्गत शाळेतील सर्वच शिक्षकांना चांगले उपक्रम राबविणाऱ्या शाळेला भेट देण्याकरिता प्रत्येक वेळेस दुसरा  तालुका, जिल्हा येथे जाणे शक्य होत नाही. याकरिता प्रत्येक केंद्रात एक उपक्रमशील शाळा निर्माण करणे जी त्या केंद्राकरिता आदर्श शाळा असावी आणि त्याकेंद्रातील शिक्षकांनी ती शाळा पाहून प्रेरणा घेऊन आपली शाळा त्याप्रमाणे तयार करावी हा त्यामागील उद्देश होता.
Ø प्रेरणा कार्यशाळाजिल्ह्यातील सर्व शिक्षक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांचे करीता आवश्यक तेव्हा तालुका तथा जिल्हास्तरावर प्रेरणा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
Ø साहित्य निर्मिती कार्यशाळाशिक्षकांच्या मागणीनुसार कृतीशील अध्ययन अध्यापानाकरिता साहित्य निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
Ø विद्यार्थी नवरत्न स्पर्धाचंद्रपूर जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून या स्पर्धेची ओळख आहे. ज्यात शाळा, केंद्र, तालुका तथा जिल्हा स्तरावर प्राथमिक तथा उच्च प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांच्या नऊ प्रकारच्या स्पर्धेचे (स्वयंस्फुर्त भाषण, वादविवाद, बुद्धिमापन ,एकपात्री भूमिकाभिनय, चित्रकला, स्वयंस्फुर्त लेखन, सुंदर हस्ताक्षर, स्मरणशक्ती, कथाकथन) आयोजन केले जाते.
Ø शिक्षक नवचेतना स्पर्धा शिक्षकांना आपल्या दैनंदिन कार्यातून विरंगुळा मिळावा तसेच त्यांच्या अंगी असलेल्या गुणांना उजाळा मिळावा या उद्देशाने मैदानी, बौद्धिक, व शैक्षणिक अशा नऊ स्पर्धांचे आयोजन या अंतर्गत केले जाते.
Ø शाळा श्रेणी उच्चीकरणशाळा स्वयंमूल्यमापन प्रपत्र अंतर्गत सन २०१४-१५ मध्ये श्रेणी मध्ये फारच कमी शाळा होत्या आणि आणि मध्ये जास्त शाळा होत्या त्यामुळे हि स्थिती बदलावी आणि शाळा श्रेणी उच्चीकरण व्हावे. या अनुषंगाने सन २०१५-१६ मध्ये ज्या शाळा जिल्ह्यात श्रेणीत होत्या त्यांच्या मार्फत मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करण्यात आले आणि श्रेणी उच्ची करणासाठी प्रयत्न करण्यात आले आणि त्यात अपेक्षेप्रमाणे यशही मिळाले.
Ø विद्यार्थ्यांसाठी विशेष कौशल्य शिबीरजिल्हा स्तरावर नवरत्न स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांना ते ज्या स्पर्धेत विजयी झाले ते  कौशल्य अधिक विकसित व्हावे. त्याविषयी त्यांना अधिक माहिती मिळावी याकरिता त्या-त्या विषयातील तज्ञामार्फत मार्गदर्शन मिळावे ह्यासाठी शिबिराचे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले. परंतु काही कारणास्तव ते आयोजित होऊ शकले नाही. जे यावर्षी (२०१६-१७) मध्ये नियोजित आहे.
Ø सत्कार समारंभ सत्राचे शेवटी थिंक टँक सदस्य तसेच संपूर्ण जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. ज्यामुळे शिक्षकांना अधिकची प्रेरणा मिळाली.
अशा प्रकारचे सन २०१५-१६ मध्ये संपूर्ण वर्षभरात विद्यार्थी, शाळा, शिक्षक या सर्वांच्या विकासातून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी मिशन नवचेतना अंतर्गत विविध उपक्रमांची आखणी करण्यात आली. आणि याही वर्षी (सन २०१६-१७ ) यातील उपक्रमांचे आयोजन सुरु आहेत.  

शब्दांकन
निखील तांबोळी
थिंक टँक सदस्य
जिल्हा परिषद, चंद्रपूर.


मिशन नवचेतना च्या उपक्रमांचे विशेष coverage unicef चे वतीने घेण्यात आले. पुढील लिंक वर जावून सविस्तर पहा.

https://www.youtube.com/watch?v=Pw3Y6-hdpYA

Comments

Popular posts from this blog