थेरगाव शाळेच्या मुली प्रथमच आकाशवाणीवरील बालसभेत सहभागी 
चंद्रपूर
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा थेरगाव पंचायत समिती पोम्भूर्ना येथील इयत्ता ७ वी च्या सर्व मुली आकाशवाणी चंद्रपूर मधील विद्यार्थ्यासाठी असलेल्या बालसभाया कार्यक्रमात वाचन संस्कृतीया विषयावर सादरीकरण करणार आहे. सदर कार्यक्रम रविवार ५ व १२ फेब्रुवारी ला २ भागात सकाळी ९.३० वाजता सादर करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हा त्यांचा व एकूणच गावाचा आकाशवाणी वरील पहिलाच सहभाग असणार आहे. तसेच या कार्यक्रमात वर्गातील सर्वसामान्य व मागे असलेल्या मुलीनीही सहभाग घेतला आहे. पहिलाच कार्यक्रम असल्यामुळे मुली व थेरगाववासी खूप उत्साहित आहेत.
या कार्यक्रमात ह्या मुली ग्रामीण भागातील वाचनाची स्थिती, शाळेतील साने गुरुजी बाल वाचनालय, डॉ.अब्दुल कलाम वाचन कट्टा, तरंग वाचनालय, वाचन प्रेरणा दिन, वाचनाविषयीच्या म्हणी, वाचन गीत वाचा मुलांनो वाचाविशेष म्हणजे हे गीत मुलींनी स्वतः रचले व चालबद्ध केले आहे, प्रचंड वाचन करून मोठे झालेले व्यक्तिमत्व, वाचनाविषयी थोरांचे विचार, परिसरभेट व वाचन अनुभव, वाचनाचे जीवनातील फायदे, वाचनालयातील पुस्तकांची नावे, वाचनावरील गोष्ट, परीक्षा व वाचन, वाचन साहित्य व मानव, आपल्याला कुठे कुठे व काय काय वाचता येते, वर्गातील अप्रगत, स्वमग्न व एकप्रकारे कुपोषित असलेल्या मुलीचे वाचनाविषयी अनुभव कथन इत्यादी वाचन घटकाविषयी मुली चर्चा करणार व आपले मत मांडणार आहे.
सदर बालसभेत इयत्ता ७ वी तील स्वाती वाघमारे, माधुरी मंडरे, संजना मडावी, करूणा मंडरे, संस्कृती कुळमेथे, श्रुती वनकर, अंकिता तलांडे, काजल सिडाम या मुलींचा सहभाग असणार आहे. सदर मुलीना शाळेतील उपक्रमशील शिक्षक हरीश ससनकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.  सर्व शिक्षक, पालक व गावकऱ्यानी मुलींना शुभेच्छा दिल्या आहेत.
                                                                                                                  हरीश ससनकर
पदवीधर शिक्षक थेरगाव
posted by Harish Sasankar, Chandrapur
9370590394




from Harish Sasankar

Comments

Popular posts from this blog