*CTF Chandrapur* (Creative Teachers Forum) या सक्रीय शिक्षकांच्या समुहाव्दारे अाज (दि.१अाॅगष्ट २०१६) शिक्षण क्षेत्रात एका नव्या चळवळीचा प्रारंभ होतोय ....... *शिक्षक सक्षमीकरण अभियान*   याअंतर्गत.         *"रचनावाद अभ्यासवर्ग"*        ...... रचनावाद रचनावाद, रचनावाद....... मुळात काय अाहे हा रचनावाद हे जाणुन घ्यायचे अाहे रचनावादाच्या राज्यातील सर्वात अभ्यासू शिक्षणतज्न्याकडून........ *प्रा.रमेश पानसे, पुणे*......      या कार्यशाळेने समुहाच्या  यावर्षातील थिमच्या दुसर्या (पहिला *Learning &Sharing*) व मोठ्या प्रमाणातील पहिल्याच कार्यक्रमाचे अायोजन होत अाहे... .....  अाज लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या स्म्रुतिदिनी व लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी  अाम्ही शिक्षक शासनाचे *'प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र',  व  चंद्रपूर जिल्ह्याचे 'मिशन नवचेतना'* हे ध्येय साद्य करण्यासाठी अामचे अल्पसे योगदान देत अाहोत........                       ..      सदर कार्यशाळेला सहकार्य करणार्या सर्वांचे अाभार........   🌹🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼        *हरीश ससनकर , संयोजक CTF*  
अाज रचनावाद वर्गाचा पहिला दिवस....... मागील वर्षभरापासून हा रचनावाद ऐकतोय... पण पुर्ण कधीच समजला नाही.... प्रगत शाळांना भेटी दिल्या त्यांनी दाखवले .... ह्या अाक्रुत्या काढल्या, शब्दांची गाडी केली, मनीमाळीवर संख्या सांगता अाल्या, पण यासाठी तुमच्याकडे ही साहित्ये असावीच बरं......... प्रत्येक मुलाला वाचता अाले, मुले बोलकी झाली की रचनावाद यशस्वी झाला.....  ईथपर्यत माहित होते..... सर्व राज्य लागले भराभरा अाक्रुत्या काढायला........ अाधीच थोडेफार समजलेल्या मुलांना गोष्टी, गप्पा करायला लावून यश सांगत सुटले......... चेन सिस्टीम माहित अाहे ना.... अाधी जे ज्वाईन होतात त्यांना सगळे गिफ्ट मिळते..... ते पुडच्यांना खरी व पुर्ण माहिती देत नाही व त्यांना डुबवतात.......... व फसवणुक झाले असे वाटल्याने अर्ध्यावर मोहिम सोडतात............ असे सुरू झाले........  व अामचे अधिकारीही त्यांच्या अडचणी समजून घ्यायच्या, सोडवायच्या सोडून विचारायला लागले...... काय हो अजुन अाक्रुत्या नाही काढल्या........ काढा लवकर, रंगवा तळफळे, ..... वरीष्ठ येतील भेटीला काय म्हणतील.   ......  रचनावाद राबवणे अावश्यक अाहे अाता तसा G.R च अाहे बाबा........ अाजपासून पारंपारीक पध्दत बंद.......    लागले लोक अाक्रुत्या काढायला व लवकरच थांबलेही !!!!!........ त्यांच्यासमोर प्रश्न होता..... अाता पुढे काय ??????      ह्या प्रकारातील फायदे तोटे, अडचणी लक्षात अाल्यावर शासनाने धोरण थोडे शिथील केले...... पध्दत कोणतीही वापरा ...... मुलं शिकली पाहिजे, शाळा प्रगत झाली पाहिजे.......... अामच्याकडे फक्त प्राथमिकचा रचनावाद अाहे..... पुढील वर्गाबाबत सध्या अामच्याकडे काही नाही............. हा काय प्रकार झाला???? ...... .... या निर्णयाने रचनावाद पुन्हा बॅकफुटवर गेला........ ज्याने राबवणे सुरू केले होते त्याने सुरू ठेवले बाकी अाले पारंपारीक पध्दतीवर....... उच्च प्राथमिक वर्गातील शिक्षकांनी अापल्यासाठी काही नाही म्हणुन स्वस्थच बसणे पसंत केले........... हे का घडले असावे...... ""अर्ध्या हळकुंडात पिवळे झाल्यामुळे"". .......  रचनावाद समजन्याच्या अाधीच हद्दपार होत असल्यामुळे हे घडले .....  ही गंभीर चुक ठरेल मित्रांनो...... "" रचनावाद मे दम है"" ........ हे अाज जाणले....... कारण तो थेट त्या व्यक्तीकडून शिकायला मिळाला ज्याने तो राज्यात रूढ केला....... प्रा.रमेश पानस, पुणे... ..,... तरी त्यांनी अाज पुर्ण रचनावाद घेतला नाही ..... अाज घेतलं ते म्हणजे........ मुलं कसं शिकतं,..... मेंदूची रचना व कार्ये.......  विश्वातील या सर्वात गुंतागुंतीच्या व्यवस्थेची चिकीत्सा..... मेंदूचे चार भाग.....मेंदू हा शिकन्याचा अवयव अाहे...... शिकण्यातील अडथडे,.....मेंदूचे तिन प्रकार....,  मुलांच्या ड्राॅपअाउटसाठी कारणीभुत घटक....... बक्षिस शिक्षा, स्पर्धा...., शिक्षकाचा दरारा, भिती, वर्तणुक......,मुलांची शाळा बदलणे  व मुलांची 'शाळा बदलणे' ह्यातील फरक...... वर्गजीवनाचा समाजजिवनाशी संबंध....  मुलं शाळेत जात नाही कारण मुलांना शाळा अावडत नाही......नैतिकता संकल्पना......  मेंदूसंशोधन.....अाकलनक्षमता..... जनुकं मनुकं...... पियाजे..... रचनावादाचे पायाभूत सिध्दांत.......   अरे बाप .... एवढ्यानेच तर बरीच गुंतागुंत उलगडली.....  .....   उद्या अाहे खरा रचनावाद.......... ....    अाभारी अाहे मा.पानसे सर, डाॅ.दिनेश नेहते, सुषमा पाध्ये ... ग्राममंगल पुणे यांचे......  
शब्दांकन......हरीश ससनकर, संयोजक CTF

""रचनावाद अभ्यासवर्ग"".......
चंद्रपूर जिल्ह्यात होत असलेल्या या अागळ्यावेगळ्या प्रशिक्षणाची अाजच्या पहिल्या दिवसाची वैशिष्ठ्ये ......१अाॅगष्ट २०१६......
      @ स्वेच्छेने नोंदनी फी भरून ६५ शिक्षकांची उपस्थिती.. @ चंद्रपूर, वर्धा, नागपूर, गडचिरोली या जिल्ह्यातील शिक्षकांची उपस्थिती.. @  सकाळी १० ते सायं ६ पर्यंत शिक्षकांची पुर्णवेळ उपस्थिती. @ मेंदूसंशोधन व अाकलनवादाची उकल, उद्याचा विषय रचनावाद .. @  प्रा.रमेश  पानसे, डाॅ.दिनेश नेहते, प्रा.सुषमा पाध्ये ग्राममंगल व बाल साहित्य परिषदेच्या या राज्यातील अाघाडीच्या रचनावाद तज्न्यांचे मार्गदर्शन.. @ मा.राम गारकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक, मा.शरदचंद्र पाटील प्राचार्य डायट यांची प्रामुख्याने उपस्थिती... @  हसतखेळत, क्रुतियुक्त सहभागासह शिक्षकांचे अानंददायी शिक्षण.... @ प्रत्येक सत्रात नविन काहीतरी शिकल्याची भावना शिक्षकांनी व्यक्त केली .... @ मान्यवरांना 'रचनावाद' व 'जीवाजी महाला' पुस्तक भेट....
मार्गदर्शन मा.गारकर सर....#.. लातूरलाही असाच प्रयोग ७०० शिक्षकांनी स्वेच्छेने प्रशिक्षण घेतले, # अाधिच उपक्रमशिल असलेल्या चंद्रपूर जिल्याला हे प्रशिक्षण स्वयंपुर्ण करेल. # अाज शिक्षक पैसे खर्चुन अाले यापेक्षा ते संपुर्ण ईच्छेसह अाले, पुर्णवेळ शिकले हे  महत्त्वाचे वाटते. # CTF च्या या प्रयत्नाचे मी कौतुक करतो.
मार्गदर्शन मा.पाटील सर.... # अापले विद्यार्थी, शाळा, मित्र स्वयंपूर्ण, सम्रुध्द करण्याचे काम अाता अापण हाती घ्यावे. # CTF न रचनावाद जिल्हाभर पोहोचवण्याचे काम पुढे न्यावे.. # हे प्रशिक्षणार्थी रचनावादाचे प्रसारक म्हणुन पुढे येतील असे अावाहन यावेळी त्यांनी केले. # CTF च्या सुंदर अायोजनाचे कौतुक केले...
प्रास्ताविक.... कल्पना बंसोड,
संचालन ..... हरीश ससनकर...
अाभार प्रदर्शन.... निखील तांबोळी.
शब्दांकन.... हरीश ससनकर, संयोजक CTF Chandrapur 9370590394 www.shiksharakshak.blogspot.com
       
       

Comments

Popular posts from this blog