from Harish Sasankar



माजी विद्यार्थी व पालकांना भेटण्याचा अानंद काही वेगळाच असतो...., हे सौभाग्य शनिवारी मला लाभले ... स्नेहाने तिच्या घराच्या वास्तूचे अामंत्रण दिले...... यापूर्वि मागील सहा वर्षापासून ती सतत संपर्कात होती, माझ्या वाढदिवसाला तिचा फोन ठरलेलाच......., तिने अनेकदा गावात येण्याचे अामंत्रण दिले होते ..... कामाच्या व्यापाने ते शक्य झाले नव्हते.......,  यावेळी तिच्या प्रेमळ अाग्रहाला नकार देवूच शकलो नाही................,... सकाळची शाळा करून, निघालो तळोधीला......ता.कोरपणा जि.चंद्रपूर......  सोबत शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.गुरूवाले मॅडम व त्यांचे यजमान अशोकराव होते.....  
          गावात प्रवेश करताच पांढर्या गणवेशातील अनेक शाळकरी मुले स्वागतासाठी सज्ज......... ग्रामपंचायत ने अाज गावात मशाल रॅलीचे अायोजन केले होते जनजाग्रूतीसाठी...... मीही सहभागी झालो त्यांच्यात...... त्यांनी माजी शिक्षक म्हनून रॅलीत अतिथीचा बहुमान दिला......   मी अालो हे माहित पडल्यावर सर्व माजी विद्यार्थी गोळा झाले....... व अापापल्या घरी चलन्याची विनंती करू लागले......  मी सर्वांना अाधी शाळेकडे जावूया म्हटले   ....... खूप छान वाटले सहा वर्षानंतर शाळा पाहून...... बराच बदलही झाला होता...... चला तुमचे उपक्रम दाखवा...... मुले उत्साहाने शाळा व उपक्रम दाखवू लागली..... मला एकदम अाठवले...... मुलांना विचारले....... शालेय वस्तू भंडार अाहे का रे शाळेत.?......... काही मुले गोंधळली..... एकाने म्हटले..... दुकान रे......  मी हो म्हटले.... हो हो दुकानच .... अाहे का रे.?........ मुले मला तिकडे घेवून गेली......  माझा अानंद गगणात मावेनासा झाला..... मी सहा वर्षाअाधी सुरू केलेला उपक्रम अाजही अव्याहतपणे  सुरूच होता........ कारे कोणी लावले रे हे दुकान ?........... ससनकर सरांनी... ...... माझ्या नावासह उपक्रम जपून ठेवलेल्या गुरूवाले मॅडम चे अाभार मानावे तेवढे कमीच !!!!!  ..... त्याच वर्षि निरोप समारंभात शाळेला दिलेली फ्लॅनेल बोर्ड फ्रेमही तशीच टिकून होती.......   सर्व व्यवहाराची माहिती घेवून, नविन काही टिप्स देवून निघालो स्नेहाकडे......... सर्व मुलांनी रस्त्यातच गाठले....... किती बदललीत मुले..... किती मोठी झाली होती कुणी १२ वी, कुणी काॅलेजला, कुणी परगावी शिकत होती तर कुनाचे लग्नही झाले होते..... स्नेहाही बरीच बदलली होती, मुलांचे चेहरे बदलतात मोठी झाल्यावर अापण त्यांना ओळखूही शकत नाही...... ते मात्र अापल्याला लगेच ओळखतात....., अगदी जातेवेळी पहिलीत असलेल्यांनीही लगेच ओळखले...... ... बेबी अाजारी असल्याचे कळले... तिच्या घरी गेलो...... ही बेबी अाताही बारीक चिरीकच अाधीसारखी...... मात्र प्रचंड प्रेमळ...... माझ्या शाळेतील शेवटच्या दिवशी सर्व मुले गहिवरली होती...... बेबी मात्र बराच वेळ स्थितप्रद्न्य होती..........अाणी अगदी जातेवेळी एकाएक ती अशी रडली की कोणी सख्खा नातेवाईक दूर जात अाहे......!!! तेव्हापासून बेबी कायम स्मरणात राहिली..... त्यावेळी वाटलेही होते फालतू घेतले प्रमोशन व शाळा सोडली.............. स्वाती व अन्य काही मुलींचे लग्न उरकले होते याचवर्षी............. शाळेत सर्वांचे अावडते रूषी व तुषार नागपूरला शिकायला गेलो होतो.......... त्यावेळी ४ थी ला असलेला सुयोग पुढे अाला.... त्याने घरी नेले.... सर तुम्ही मला मारले होते...निर्भिडपणे म्हणाला.......... मी लगेच हो म्हणालो...... ईतकेच काय त्यावेळी तू केलेला चेहराही अाठवतेय रे मला.... त्याची अाई म्हणाली... सर यानेतुम्ही जाईपर्यंत सांगीतलेच नाही मला.......... मला अगदी गहिवरून अाले ....... माझ्या मारात काय दिसले असेल याला...... खूप वाईट वाटले...... अाई म्हणाली सर हा एकुलता एक..... खूप लाडाचा पण त्यानंतर छान रहायचा, नियमित अभ्यास करायचा,  अाता सैनिकी शाळेला अाहे......   वाटेत जी मुले भेटली त्या बहुतेकांनी माझ्या हातचा मार खाल्लेलाच होता.... मी अनेकांना मिठीच मारली..... किती रे तुमचं प्रेम...... मी तुम्हाला मारले तरी तुमच्या प्रेमात, अादरात तसूभरही फरक पडला नाही ......,  एक पालक म्हनाले,  सर हा तुमच्यामुळेच सुधरला...... ही प्रशंसाही अाता खूष करत नव्हती .... मोठे शल्य मनाला भिडत होते ....... काही गरज होती का खरचं मारायची ? .....   वेगळ्या पध्दतीने समजावून, त्यांच्या मनाचा वेध घेतही स्वभावात परीवर्तन घडवता अाले असते........ असे प्रकार याअाधीही माझ्यासोबत अनेकदा घडले होते ..,...  हातचा मार खाल्लेली मुले भेटली अनेकदा......... त्यांना पाहून याविषयी मी गंभीर झालो होतोच ........ तेव्हापासून मुलांना मारणे सोडल्यागतच होते तरी कधीमधी एखाद दुसरा धपाटा पडायचाच.... .. .. तोही अगदी न मारल्यागतच असायचा......... किंवा नुसता हात उगारायचा......, .. एक सांकेतीक म्हनून वापरलेला..........  परंतू अाजच्या घटनेने हालवून सोडले पुन्हा एकदा........  यापुढेतरी अापल्या हातून असे घडता कामा नये........ काय युक्त्या वापरता येईल त्या वापरू ........... मुलांच्या वाईट सवयी बदलवण्यासाठी, चांगले सुसंस्कार, सवयी  लावण्यासाठी अाजपासून नवनवे तंत्र शोधण्याचे काम सुरू करायचे ठरवले.......... स्नेहाला स्पर्धा परीक्षेची पुस्तके व तिच्या वडीलांना व्रूक्ष भेट देवून ..........गाव सोडून गेल्यावर कामाच्या व्यापात, नविन शाळा व प्राथमिक शिक्षणाच्या विकासासाठी राबवत असलेल्या उपक्रमामुळे शाळा व गावासाठी फार काही करू शकलो नाही मात्र पुढे जमेल ती मदत नक्की करणार या विचारात माघारी फिरलो....    हरीश ससनकर, चंद्रपूर ९३७०५९०३९४.          shiksharakshak.blogspot.com

Comments

Popular posts from this blog