अाजचा दिवस खूपच घाईचा निघाला,  ..... निखील च्या वडीलाचा ८५ वा वाढदिवस व विजय भोगेकर सरांचाही वृक्षारोपन वाढदिवस..... माझा असो की माझ्या मित्रांचा वाढदिवस म्हटले की रक्तदान,  वृक्षारोपन अालेच,.... तसे सक्तीचे प्रबोधन असतेच त्यांना...... या तालुक्यात बदली झाल्यावर एक मित्र गमतीने म्हणाले होते अाता ससनकर सर रक्त काढणार सर्वांचे !!!!. रक्तदान शिबीराला फार मित्र जमले नाही तरी रक्तदान करायचेच या विचाराने सकाळी ७.३० लाच जिल्हा सामान्य रूग्णालयात अाम्ही पोहोचलो...... विजय मी व भागवत नेहरकर यांनी स्वेच्छेने रक्तदान केले.... हे माझे ६४ वे रक्तदान..... पुढे निखीलचे वडील मा.लक्ष्मीकांतजी तांबोळी यांचे व विजय चे हस्ते हनुमान नगर, तुकूम परीसरातील दुर्गादेवी मंदिर परीसरात  केले... अाम्हीही गुलमोहर, कडुलींब, पाम, जांभुळ, जाम अशी काही झाडे लावली.....  त्यांच्या संगोपनाची जबाबदारी तांबोली काकाजींनी घेतली....... शाळेसाठी निघालो, थोडा उशीरच झाला ४५ कि.मी दूर शाळा, परीपाठ मिळाला.... काही सांगायचे होते मुलांना,  परंतु व्हरांड्यात पावसाची झडप येत होती, मुलांच्या अंगावर पाणी यायला लागले होते करीता परीपाठ अाटोपता घेतला. वर्गावर्गात सांगायचे ठरवले.   सर्वप्रथम ६ वीला विषय घेतला "मुक्त विषय". वास्तविक विज्ञान लिहिला असता तरी जमले असते, पण सस्पेंस साठी असे केले....... मुले फळ्याकडे पहातच बसली हा कोणता विषय ? ... उपघटक घेतला " रक्तदान" .... नुकत्याच केलेल्या रक्तदानाविषयी संपूर्ण माहिती दिली.... त्यांना अाजवर नातेवाईक अाजारी असले की रक्त देतात एवढेच माहित होते........ पण हे रक्त अाणतात कोठून, कोण देतो रक्त, का देतो, देण्याची गरज, त्याबाबतची भिती, समज गैरसमज, रक्तगट याविषयी सविस्तर माहिती दिली........ रक्तदान केलेला हात दाखवला........ अाश्चर्य व कुतूहलाने ते सर्व ऐकत होते.... लगेच  प्रश्न  टाकला का रे तुम्ही करणार का रक्तदान मोठे झाल्यावर ?     ताडकण सर्वांनी मोठ्या अावाजात होकार दिला.....   भविष्यात न घाबरता रक्तदान करणारे दाते तयार करण्यात यश मिळाल्याचे व त्यांना विज्ञानात पुढे येणार्या घटकाची पार्श्वभूमी तयार केल्याचे समाधान दिवसभर पुरले ....... ..   ...........         हरीश ससनकर, चंद्रपूर ९३७०५९०३९४ www.shiksharakshak.blogspot.com

Comments

Popular posts from this blog