गाव व शाळा विकासासाठी झटणारे सरपंच ... चंदूपाटील मारकवार...   १६ वर्षापासून सतत मनात एकच ध्यास... गाव,गाव नी गाव...... २००१ च्या संतगाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात प्रचंड काम....... राजगड ता.मुल जि.चंद्रपूर हे गाव राज्यात प्रथम...... त्यानंतर सोडून न देता...... विकास सुरूच....... राज्यशासनाच्या ग्रामस्वच्छता समितीवर सदस्यपदी निवड.......तरीही........गाव मनातच....... एक एक टप्पा पार करत काम पुढे सुरूच...... गावकरी त्यांची दरवेळी सरपंच, उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड करतात.......  माझी अाधीपासूनची थोडी ओळख.... पुढे जि.प.च्या मिशन नवचेतना मध्ये काम करतांना त्यांचा शाळाविकासाचा ध्यास समजला....... त्यांनी अनेकदा फोनवर याबाबत चर्चा केली..... कशी करता येईल शाळा प्रगत, सर्वांगसुंदर...., जिल्ह्यात राज्यात अग्रेसर.... शाळा पहायलाही अामंत्रण दिले....... वर्षभर वेळ न मिळू शकल्याने ११ जून हा सुट्टीतला मुहूर्त निघाला..... सकाळीच भाऊंचा अाठवणीने फोन..... ग्रामपंचायत व शाळा बघीतली....... भाऊंचा प्रश्न एवढे केले..... अजून काय करू सांगा?......  भाऊंची दुरद्रूष्टी व केलेले प्रचंड काम पाहून दंगच झालो ! ...... सुसज्ज दुमजली ईमारत, वाचनालय, मिटींग हाॅल, गावातील तरूणाना अभ्यासााठी स्वतंत्र हाॅल, अद्ययावत ग्रामपंचायत ईमारत, संगणक कक्ष.......... मग सरपंचाचे केबीन कसे असेल कल्पना करा? ...... अंदाज चुकला........ नाही सरपंचाला केबीनच नाही?...... सरपंच हा गावाचा सेवक ही भावना...... कुठूनच कसलीही मदत न घेता केलेले काम, .... ईतके कल्यावरही या माणसाला अजून काम दिसते हे अाश्चर्य..!.... ...... पुढचे टार्गेट गावातली जि.प.ची शाळा......... शाळेला काय पाहिजे ते सांगा असे शिक्षकांना अावाहन........ एवढा अाधार असला तर सर्व सहज शक्य अाहे........ अाजवर शाळेत मुलांमुलींसाठी अद्ययावत शौचालय, वर्गसंख्येपेक्षा अधिकच्या वर्गखोल्या, अाकर्षक दुमजली ईमारत, वालकम्पाऊंड, बाग, ही कामे झाली....... अाता अद्ययावत मुख्याध्यापक कार्यालय, विद्न्यान कक्ष, ई-लर्निंग कक्ष, हाॅबी रूम, सुसज्ज किचन (अगदी घरच्यासारखे), परसबाग, संपूर्ण शाळा चित्रमय, अाकर्षक,शिकण्याजोगी, बाह्यभाग गावकर्यांना मार्गदर्शक संदेश युक्त, ही कामे सुरू........... अाम्ही यात अाणखी संपूर्णता अाणण्यासाठी अाणखी काही सुचवले.......... अाता पुढचे काम शाळेतील शिक्षकांचे....... गुणवत्ता......... अाणी शाळा राज्यात प्रथम.......  Hats of u Chandubhau......... 
हरीश ससनकर, निखील तांबोळी..... चंद्रपूर

Comments

Popular posts from this blog