.    
अाज ६ जून शिवराज्यभिषेक सोहळा....... काल स्वराज्याची राजधानी रायगडाला भेट दिली........ ४ ला नांदेड वरून निघालो कसेही करून अाज गडावर पोहचायचं हा उद्देश.... महाडला पोहचायला रात्रीचे ११ वाजले, मुक्कामाची ठिकाणे हाउसफुल....... प्रचंड पाउस...... अशात घाट पार करून गडाजवळ पोहचायचेच या हेतूने पुढे निघालो......... पाचाडला पोहचायला रात्रीचे २.३० वाजले...... एव्हाना शिवप्रेमीही बर्यापैकी पोहोचले होते..... धर्मशाळेत थोडी जागा मिळायली पडायला, त्यातल्या त्यात जोराचा पाउस..... झोपायचे एकही साधन नाही..... झोपलेल्या शिवप्रेमींच्या सतरंजीवर मिळालेल्या जागेत पडलो, उरलेल्या रात्रीत पावसाच्या झडपेने २ वेळा जागा बदलावी लागली.......शिवप्रभोच्या भेटीच्या अाशेत, पावसाकडे पाहत कशीबशी पहाट झाली....... सकाळी रोपवेने गडावर .... माझे स्नेही राज्यभिषेक सोहळ्याचे अायोजक तथा दै.पुढारी पुणेचे सहयोगी संपादक सागरजी यादव यांच्या भेटीचा सुवर्णयोग, त्यांच्याकडून मिळालेली महोत्सवाची माहिती ...... ही चांगली सुरवात....... गड पाहतांना.. राजांच्या दुरद्रुष्टीची कल्पना अाली...... अाजही भक्कम.... अभेद्य तटबंदी... बाजारपेठेसह सर्व सुविधा..... राज्याची राजधानी..... राज्यभिषेक सोहळ्याचा मूक साक्षीदार...... हिरकणीचा पराक्रम, असा एक ना अनेक घटनां अनुभवलेला हा गड.......अाजही तीच परंपरा पाळत शिवप्रेमींची मोठ्या प्रमानात उपस्थिती......, सोहळा चांगला व्हावा म्हणून कार्यक्रमस्थळी साचलेलं पाणी साफ करणारी तरूणाई............  कोल्हापूर चे छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मेहनत घेवून सुरू केलेला महोत्सव...... पाचाडची अाई जिजावूची प्रेरणादायी समाधी............. सर्वात महत्वाचे ......अख्या जगाला पराक्रम, अभय, मानुसकी, स्वराज्य, सुराज्य, निष्ठा, मानवता, बंधुप्रेमाचा संदेश देणारी....... प्रचंड प्रेरणा देणारी शिवछत्रपतींची समाधी....... नतमस्तक झालो,...... माझ्यासाठी राजांनी केलेल्या कार्याप्रती अाभार व्यक्त करत पुढे अाणखी काम करण्याचे मनाशी ठरवून दु:खी मनाने गड सोडला........जय जिजाऊ...... जय शिवराय........,,,,,,,.. हरीश ससनकर.......

Comments

Popular posts from this blog