चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी मा. आशुतोष सलील साहेब यांचे मी जिल्ह्यातील सक्रीय शिक्षकांच्या वतीने स्वागत करू इच्छितो ........ सर आपण जिल्हा परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कार्यरत असतांना केलेले कार्य आम्ही कदापि विसरू शकणार नाही. ... जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात आपले भरीव योगदान राहिले आहे , एक प्रकारचा जिवंतपणा आपण या क्षेत्रात आणला . त्यनंतर मा.डॉक्टर महेंद्र कल्याणकर साहेबांनी फक्त ११ महिन्यात शैक्षणिक क्षेत्राला ढवळून टाकले , आमुलाग्र बदल घडवून आणला. आज आम्ही राज्यात अनेक बाबीत अग्रेसर आहोत. .या काळात आम्ही जिल्ह्याचे वेगळेपण सिद्ध केले आहे. विद्यमान जिल्हाधिकारी  मा.डॉक्टर दीपक म्हैसेकर साहेबांनिहि  यात आपले बहुमूल्य योगदान दिले. जवळपास ४५ लक्ष निधी त्यांनी " मिशन नवचेतना "" साठी दिला. त्यातून आम्ही शिक्षक नवचेतना स्पर्धा , बाल चेतना  हे मुलांचे त्रैमासिक, पेक कार्ड हि शारिरीक शिक्षण योजना  व अन्य योजना राबवल्या.
         आज आपल्या रूपाने आम्हाला आणखी मोठा आधार मिळाला आहे, आपल्या कार्यकाळात मागील नाविण्यपूर्ण प्रयोग सुरूच राहील , त्यांना आणखी समर्थन मिळेल अशी आशा आहे . आपल्याला शिक्षण क्षेत्रात विशेष आस्था आहे हे आम्ही जाणतो.  स्पर्धा परीक्षा अध्ययन केंद्र जिल्ह्यात सुरु झाले ते केवेल आपल्या प्रयत्नाने, काही दिवसातच ते पूर्णही होईल. याचप्रकारे आणखी काही मैलाचे दगड आपण या जिल्ह्यात निर्माण कराल हि अपेक्षा आहे. आही सर्व आपल्या सोबत आहोत सर,     धन्यवाद ......... हरीश ससनकर, शिक्षक , चंद्रपूर ९३७०५९०३९४ , www.shiksharakshak.blogspot.in


Comments

Popular posts from this blog